Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीगडचिरोली | वाघाच्या शिकार प्रकरणात वनविभागाला मोठे यश...सहा आरोपींना अटक वनगुन्हा दाखल...

गडचिरोली | वाघाच्या शिकार प्रकरणात वनविभागाला मोठे यश…सहा आरोपींना अटक वनगुन्हा दाखल…

चातगाव वनपरिक्षेत्रात मंगळवारी झाली होती विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार…

गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव वन परिक्षेत्रातील अमिर्झा बिटात विजेचा प्रवाहामुळे वाघाच्या शिकारप्रकरणात वन विभागाने संशयित सहा आराेपींना अटक करण्यात आली असून शिकारीसाठी वापरलेले हत्यार व मृत वाघाचे अवयव जप्त करण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.

अमिर्झा गावालगतच्या जंगलातील कंपार्टमेंट नं. ४१७ मध्ये जिवंत विद्युत तारेद्वारे वाघाची शिकार करण्यात आली हाेती. ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती. वन विभागाने चाैकशी अधिकारी नेमून या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली.

२६ ऑक्टाेबरला वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रमोद मनोहर मडावी (२९), सुनील केशव उसेंडी (२८), दिलीप ऋषी उसेंडी (२८), प्रकाश दयाराम हलामी (४२), चेतन सुधाकर अलाम (२५) सर्व राहणार मरेगाव टाेली व नीलेश्वर शिवराम होळी रा. मोहटोला ता. जि. गडचिरोली आदी आराेपींचा समावेश आहे.

आरोपींविरुद्ध वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात सखाेल चाैकशी सुरू असून, आराेपींनी आणखी किती शिकारी केल्या याबाबतसुद्धा उलगडा केला जात आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: