Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsगडचिरोली | प्रसूतीसाठी घरी आलेल्या महिलेवर दोन सख्या भावांचा बलात्कार...

गडचिरोली | प्रसूतीसाठी घरी आलेल्या महिलेवर दोन सख्या भावांचा बलात्कार…

गडचिरोली :

कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली. या घटनेने गडचिरोलीच नव्हे तर विदर्भ हादरले. धमधीटोला येथील दोन नराधमांनी कुकर्म केले. तेही एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत. त्यामुळे या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. कुरखेड्यावरून दोन किलोमीटर अंतररावर धमदीटोला गाव आहे. विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. तरीही दोन सख्या भावांच्या वासनेची बळी ठरली.

प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर दोन सख्या भावांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी धमदीटोला येथील रहिवासी संजय तुलाराम कपूरडेरिया (३८) आणि ताराचंद तुलाराम कपूरडेरिया (३२) या दोन नराधम भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही सात महिन्यांची गर्भवती आहे. प्रसुतिकरिता ती काही दिवसांपूर्वी माहेरी आलेली होती. दरम्यान, १० ऑगस्टरोजी पीडितेचे आई वडील शेतीच्या कामाकरीता बाहेर गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी संजय आणि ताराचंद याने पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून बळजबरी घरात प्रवेश करून महिलेवर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दखल केली. दरम्यान कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून विवाहित आहे. पीडिता गर्भवती असल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: