Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनअनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज...

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज…

मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’ निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल निर्मित ‘गाफील’ २ फेब्रुवारीला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित…

मुंबई – गणेश तळेकर

आदित्य या तरूणाच्या आयुष्यात होणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘गाफील’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच आता या ट्रेलरची एंट्री झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशय-विषयाला धरून चित्रपट येत आहेत, ‘गाफील’ हा चित्रपटही त्यापैकीच एक असल्याचे ट्रेलरवरून जाणवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ. नवनीत रवी राणा उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

आजूबाजूच्या लोकांमध्ये संशयास्पद वर्तणूक असलेला आदित्य, सतत मुलींसोबत राहायची सवय, मुलींना फसविण्याचा स्वभाव आणि मुलींचा फायदा घेण्यासाठी असुसलेला आदित्य… त्याच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘गाफील’ हा चित्रपट.

पण कालांतराने असं काही घडतं ज्यामुळे त्याचं आयुष्य संपूर्णतः बदलून जातं. नक्की काय घडतं हे ट्रेलरमध्येच पाहा. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. मात्र, त्यांचं नक्की नातं काय हा प्रश्न औत्सुक्याचा ठरतो.

अमरावतीच्या खा. नवनीत राणा या पूर्वी कलाकार असल्याने आणि त्यांना कलेची जाण असल्याने, त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. मराठी माणसानेच मराठी चित्रपट डोक्यावर घेतला पाहिजे. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्याने मला तिकडच्या प्रेक्षकांचा अनुभव आहे.

ते लोक त्यांच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. तसाच आपण मराठी लोकांनीही दिला पाहिजे. आपल्या मातृभाषेतील कलाकृतींना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि जसे इतर भाषांतील चित्रपट जागतिक स्तरावर पुरस्कार मिळवतात, तसेच मराठी चित्रपटानेही त्या उंचीवर पोहोचले पाहिले आणि त्यासाठी मराठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत. खा. राणा यांनी व्यक्त केले.

धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. 2 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: