रामटेक – राजु कापसे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिन साजरा व शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. असा हा वार्षिक निकाल राज्यातील सर्वच जि.प.प्राथमिक शाळा,इतर विद्यालय व महाविद्यालयामध्ये जाहीर केला जात असतो.
त्याचप्रमाणे शिवणी शाळेत सुध्दा करण्यात आला परंतु जि.प.प्राथमिक शाळांकडे ग्रामिण भागातील पालकांचा,जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन बदल करून मोळकडीस व सध्याच्या काळात ओस पडत असलेल्या जि.प.शाळा ह्या पुन्हा टिकवून त्यांचे पुनर्जीवन व्हावे करिता शिवणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलेश नन्नावरे यांनी “स्टुडंट ऑफ द इअर” हा अंशुमन राजेश बडवाईक वर्ग चौथा याला पुरस्कार जाहीर करून अनोखा उपक्रम सुरू केला.हा पुरस्कार विद्यार्थीचे वार्षिक निरीक्षण, गुणवत्ता,उपस्थिती,क्रीडा,आकलन,संवाद इतर कौशल्य या सारख्या नोंदी ठेवून देण्यात आला.
या पुरस्काराने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करून विद्यार्थ्यांचा कल हा जिल्हा परिषद शाळेकडे यावा.यासाठी करण्यात आला आहे.अशा विविध उक्रमाची सांगड घालून गेल्या चार वर्षातील शाळेची पटसंख्या ही ७६ वरून १०४ पर्यंत आली अशा विविध उपक्रमांचा नक्कीच पालक व गावातील इतर नागरिकांना जि.प.शाळेबद्दल आपुलकी,प्रेम,जिव्हाळा निर्माण होऊन पुढे या शाळांना भरभराटीचे दिवस येतील.
या पुरस्कार वितरण, महाराष्ट्र दिन व वार्षीक निकाल जाहीर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विजय भुरे (सरपंच),भोजराज धुवांधपार (उपसरपंच),राजेश बडवाईक(अध्यक्ष शा.व्य.समिती),विकास गणवीर(केंद्र प्रमुख),गणेश बडवाईक(पो. पा.)वैशाली धुर्वे व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश नन्नावरे (मुख्याध्यापक) यांनी केले तर गणेश बारेकर सह.शिक्षक यांनी पाहुण्याचे आभार मानले.
“ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक शिक्षकाने आपली जबाबदारी समजून असे उपक्रम शाळांमध्ये घेतल्यास नक्कीच शाळांना जुने दिवस येतील असा विश्वास आहे.” -निलेश नन्नावरे (मुख्याध्यापक जि.प.शाळा शिवणी)