रामटेक तालुक्यातील हातोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील कोडापे यांची विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने आज दिनांक 21 रोजी त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य अस्मिता बिरणवार,सामाजिक कार्यकर्ते राहुल किरपान,एड.नंदकिशोर जयस्वाल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कोल्हे सर, शिक्षक जीवन राऊत सर,सरपंच राजेश कुमरे उपसरपंच राहुल धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक सुनील कोडापे हे हातोडी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या दहा वर्षापासून कार्यरत होते.त्यांच्या कालावधीत शाळेची गुणवत्ता,विद्यार्थ्यात शाळेची आवड निर्माण करणे, शिक्षक व पालकात उत्तम समन्वय, शाळेसाठी विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना शाळेय प्रवाहात वाहून आणणे, शाळेसाठी जिल्हास्तरावर विविध शालेय, शैक्षणिक, साहित्य उपलब्ध करून देणे, शिक्षक विद्यार्थी यांच्यात मोठा समन्वय साधने, शाळेला मुख्यमंत्री सुंदर शाळा अंतर्गत एक लाख रुपयाचे बक्षीस मिळवून देणे, जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांकरिता कॉन्व्हेंट सुरू करणे असे अनेक उपक्रम मुख्याध्यापक कोडापे यांनी दहा वर्षात राबविले.
मुख्याध्यापक कोडापे यांना आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारसह शाळेला विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त करून दिले. हातोडी ग्रामस्थांमध्ये आपली प्रतिमा स्वच्छ ठेवून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केल्याने त्यांची एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्याच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने आज दिनांक 21 रोजी निरोप समारंभ कार्यक्रम घेऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी त्यांच्या केलेल्या शाळेबद्दल कामाच्या यथोचित उल्लेख करून कार्याला उजाळा दिला
निरोप समारंभ कार्यक्रमात निरोप देताना एकदम भावनिक वातावरण निर्माण झाले होते हातोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील इतिहासात प्रथमच असे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक लाभले होते त्यांची बदली झाल्याने ग्रामस्थ नाराजी पसरली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद केळवदे, उपाध्यक्ष जया मथुरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नंदकिशोर कोळे पालीग्राम गाते ज्ञानेश्वर किशोर चौधरी गौतम गजभिये धनराज लिल्हारे अतुल धुर्वे लता लिल्लारे राजकुमार भलावी पूर्वा गराडे शर्वरी बघेले सह शाळेतील विद्यार्थ्यांनी अर्थ परिश्रम घेतले.