मूर्तिजापूर : गेल्यावर्षापासून मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात समाजसेवेच्या नावावर चारपाच भावी आमदार सक्रिय झाले मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून स्वतःचे प्रमोशन सुरू केलं. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे लाखपुरी जि प सर्कलचे सदस्य व राष्ट्रवादीचे नेते सम्राट डोंगरदिवे यांची, सम्राटभाऊ ने अवघ्या मतदारसंघात पैश्याचा पाऊस पाडून एक वेगळं नाव केलं होतं, ज्याच्या त्याच्या तोंडात सम्राट भाऊ. अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली की अपक्ष जरी उभे राहिले तर निवडूण येतील असा अनेकांचा अंदाज होता, मागेल त्याला वर्गणी, गावातील विहार, मंदिरासाठी मोठी देणगी दिली जात होती. भाऊकडे ‘नाही’ शब्दच नव्हता पण गेल्या महिन्यापासून सम्राट भाऊ गायब झाल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे, तर अनेकांच्या मते भाऊ जवळचे पैसे संपल्याने भाऊ कोणाचा फोन घेत नाहीये. त्यामुळे मतदारसंघात भाऊ बद्दल वेगळाच सूर निघत आहे. अनेकांनी तर भाऊ निवडणूक लढणार नसल्याचे सांगून टाकले. भाऊने जेवढी कमावली तेवढी गमावली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे भावी आमदार ज्यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत 42 हजाराच्यावर मतदान घेऊन मतदारसंघात एक वेगळा ठसा उमटविणारे रवी राठी यांनी या संधीचा फायदा घेत आपला ‘मिशन आमदार’ हा कार्यक्रम जोरदार पणे राबविणे सुरू केले असून मतदार संघात भेटीगाठी व विविध कार्यक्रमात हजेरी मग तो पक्षाचा असो किंवा धार्मिक भाऊ तेथे कार्यकर्त्यांसह हजर, त्यामुळे रवी राठी यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसत आहे. एवढंच काय तर सम्राटभाऊचे कार्यकर्तेही आता हळूहळू रवी राठी यांच्याकडे येऊ लागल्याने रवी राठी यांची बाजू मजबूत झाल्याचे दिसत आहे.
रवी राठी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली पण ती खरी नाही, मात्र त्यांना भाजपचे बरेच कार्यकर्ते पक्षात मध्ये सामील व्हा! अशी विनवणी करीत असल्याचे चर्चा आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सामील झाल्याने या जागेवर वंचित दावा करणार असल्याने रवी राठी यांनी भाजप मध्ये जाऊन निवडणूक लढवावी असे जवळचे कार्यकर्ते त्यांचा वळविण्याचा प्रयत्न करीत आहे….