शाहबाबु दर्गा चे दोन कोटी रुपये विकास कामांचा भुमीपुजन
पातूर – निशांत गवई
विधानसभा मतदारसंघाचा विकास करीत असताना जनतेच्या मूलभूत सुविधा सोबत सर्व धर्मातील नागरिकांचे आपापलेले असलेले श्रद्धास्थानाचा विकास करणे महत्त्वाचे असून श्रद्धास्थानातील मंदिर असो दर्गा असो किंवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ असो या कामाच्या विकास कामा करिता कोणताही निधी कमी पडू देणार नाही पातुर येथील शहाबाबू दर्गाच्या विकास कामाकरिता दोन कोटी रुपये चा निधी दिला असून अजूनही या दर्ग्याच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नसल्याचे मत आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.
पातुर शहरात गेल्या दोन वर्षात 25 ते 30 कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहे पातुर शहरातील धार्मिक श्रद्धास्थाने मग ते सिदाजी महाराज मंदिर असो शिवाजी महाराज पुतळा शुशोभिकरण असो रेणुका देवी टेकडी मंदिर असो किंवा शहाबाबू दर्गा असो याकरिता विविध योजनेच्या माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला पातुर येथील शहाबाबू दर्गाच्या विकास कामाकरिता दोन कोटी रुपये निधी मंजूर असून या माध्यमातून संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या शहाबाबू दर्ग्याच्या विकासकामात भर पडणार आहे.
याशिवाय पर्यटन क्षेत्र विकास अंतर्गत शहाबाबू दर्गाकरिता अजूनही आवश्यक तो निधी उपलब्ध करून देवु शहाबाबू दर्ग्याच्या निधी करिता माजी नगराध्यक्ष हिदायत का रूम खान यांनी वारंवार पाठपुरावा केला असून जनतेच्या सहकार्याने व आशीर्वादाने आपण ही विकास कामे करू शकत असल्याचे मत आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले बाळापूर मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये हरिपाठ करणाऱ्या भक्तांसाठी टाळ मृदुंग विनाचे नुकतेच वाटप करण्यात आले धार्मिक विकास कामे करीत असताना कोण कोणत्या धर्माचा जातीचा आहे.
याचा आपण कधी विचार केला नसून आपल्या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम सतत केले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले असून मतदारसंघातील सर्व धर्मातील धार्मिक स्थळांच्या विकास कामाकरिता सदैव तयार राहणार असल्याचे मत व्यक्त करत पातुर येथील शहाबाबू दर्ग्याच्या विकासात अजून भर पडणार पाडण्याकरिता आपण सदैव सर्वसामान्य सोबत आहोत असे मत आमदार नितीन देशमुख यांनी शहाबाबू दर्ग्याच्या विकास कामानिमित्त आयोजित कार्यक्रमातून व्यक्त केले.
पातूर येथील शहा बाबू दर्गा विकास कामाकरिता आमदार नितीन देशमुख यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल कय्युम सौदागर हे होते तर मंचावर माजी नगराध्यक्ष हिदायत खा रुमखा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष इरफान जागीरदार अक्षयानंद महाराज अनिक पटेल,
परशराम उंबरकर रवींद्र मुर्तडकर सागर रामेकर निरंजन बड गुड्डू पैलवान नबू शहा अलहाज अयुब ठेकेदार सय्यद जमीर साहब शेख इद्रीस हसन खान सय्यद रहीमभाई सय्यद अशपाक सय्यद खलील पैलवान सय्यद अकबर सहाब वहीद खान गजानन शिंदे सरपंच अर्चनाताई शिंदे आसिफ खान मोहम्मद मेहताब ग्रा प सदस्य सय्यद इरफान मोहम्मद शाकीर फिरोज खान ग्रा प सदस्य अतिक पैलवान आबेद अली सय्यद नवीन मुन्नाभाई मेडिकलवाले जुनेद बिनधास्त राजू शेख मुख्तार मंगल डोंगरे सय्यद इक्बाल पैलवान आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय कावळ्यांपासून सावध रहा -हिदायत खा उर्फ इद्दु पेहलवान शहाबाबू दर्ग्याच्या विकास कामाकरिता आमदार नितीन देशमुख यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून शाहबाबु दर्गा चे विकास कामे यामध्ये भर पडणार आहे.
गेल्या शाहबाबु दर्गा मध्ये राज्य भरातुन भाविक येतात दर्ग्याच्या कामाकरिता पाठपुरावा करत असताना काही राजकीय लोकांनी यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून अशा वेळोवेळी रंग बदलणाऱ्या राजकीय कावळ्यांपासून सावध राहण्याचे मत हिदायत खा रूमखा यांनी व्यक्त केले.
यासोबतच सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मतदार संघाचा व धार्मिक स्थळांचा विकास साधणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.