रामटेक – राजू कापसे
मार्च फेब्रुवारी महिण्यात घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल आज आँनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आला. त्यात रामटेक तालुक्यामधून राष्टीय आदर्श विघालय येथिल विघार्थीनी कु.सर्वज्ञा वेदप्रकाश मुकद्दम हिने ९७.८४ % टक्के गुण मिळवून प्रथम तर श्रीराम विघालय रामटेक येथिल क्रिष्णा जयदेव डडोरे याने ९६% टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमाक पटकविलेला आहे .तिसर्या स्थानावर समर्थ विघालयचा उत्कर्ष केशव कावळे ९५.६०% टक्के गुण घेतलेले आहे.
रामटेक शहरात समर्थ विघालय उत्कर्ष कावळे प्रथम,द्वितीय तनवी राजेश कावडकर तर तृ तीय समिश्रा विजय टिपले हिने पटकविले आहे समर्थ काँ न्व्हेन्ट मधून कृतीका सहारे ही प्रथम आलेली आहे. श्रीराम कनिष्ठ विघालय येथून प्रथम क्रिष्णा जयदेव डडोरे ,द्वितीय अवेश हमीद शेख,तृतीय भावेश नितिन बरबटे तथा आर्यन वंसता अहिकर चौथा क्रमाक मिळविलेला आहे. श्रीराम कन्या विघालय येथिल जान्हवी रविन्द्र क्षीरसागर प्रथम,द्वितीय मेघना संजय आटबैले तथा प्रिती युवराज मोटघरे तृतीय आलेली आहे.
ज्ञानदिप काँन्व्हेन्ट येथून तन्मेय दारोडे प्रथम,द्वितीयइंद्रजित गुप्ता,तर पुर्वा जयंत सावरकर हिने पटकविलेला आहे.राष्टीय आदर्श विघालय सर्वज्ञा मुकद्दम तरवेदांत घरजाळे याने द्वितीय स्थान पटकविलेला आहे.श्रीराम विघालय ८८.४६% टक्के,राष्टीय आदर्श ९८%टक्के ,ज्ञानदिप काँन्व्हेन्ट ९४.४०% टक्के ,श्रीराम कन्या विघालय ९४.५९ %टक्के, समर्थ विघालय ९१.५३% टक्के निकाल लागलेला आहे.