Saturday, November 23, 2024
Homeसामाजिकखैरी बिजेवाडा येथे १४७ लाभार्थ्यांना नि:शुल्क चष्मे वाटप…

खैरी बिजेवाडा येथे १४७ लाभार्थ्यांना नि:शुल्क चष्मे वाटप…

राजु कापसे
रामटेक

रामटेक:- आपला आमदार आपल्या सेवी अभियान अंतर्गत अँड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे आयोजित खैरी बिजेवाडा येथील दिनांक ८ जून रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिर मधे ज्या लाभार्थीना चष्मे लागले त्या करिता दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम पंचायत कार्यालय खैरी बिजेवाड़ा येथे १४७ लाभार्थीना चष्मे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी युवासेना रामटेक तालुका प्रमुख राजकुमार खोब्रागडे,शिवसेना वैद्यकीय नागपूर जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर, सरपंच उर्मिलाताई जगदीश खुडसाव, लक्ष्मी राजकुमार खोब्रागडे, सिमा परतेती, अनिल रौतेल,पुनम चवरे,माजी सरपंच रमेश धुर्वे, प्रमोद वानखेडे, आदित्य खंडाळकर,सुमित कामड़े उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: