नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -हिगंना -मारवाडी युवा मंच शाखा नागपूर तर्फे दिव्यांग बंधू भगिनीं करिता मोफत कृत्रिम हातपाय लावून देण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा मारवाडी युवा मंचाचे संस्थापक रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री सुनील केदार, मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग,अध्यक्ष कन्हैया मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरात पुणे येथील डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या यमुने दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम हातपाय लावून दिले त्याचा आनंद दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या शिबिराचा विदर्भातील शेकडो दिव्यांग बंधू-भगिनींनी लाभ घेतला.
या शिबिराला यशस्वी करण्याकरिता मारवाडी युवा मंच सचिव हेमंत शर्मा, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल,माजी अध्यक्ष अजय मल, सुधीर बाहेती, संजय पालीवाल,उपाध्यक्ष सचिन अग्रवाल, दीपक अग्रवाल, प्रचार मंत्री राज चांडक, सदस्य हिमांशू चांडक,राजेश मोहता,राहुल टावरी, शरद राठी, आदींनी अथक परिश्रम घेतले.