नागपूर – शरद नागदेवे
मारवाडी युवां मंच शाखा नागपूर, मिडटाऊन नागपूर व साधू वासवाणी मिशन पुणे यांच्यातर्फे न्यू इरा हॉस्पिटल यांच्या सहयोगाने हात पाय नसलेल्या दिव्यांगांकरिता कृत्रिम हात व पाय लावून देण्याचे शिबिर सिताबर्डी नागपूर येथील माहेश्वरी पंचायत भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन न्यू इरा हॉस्पिटल चे संचालक नीरज अग्रवाल,मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग,यांच्या हस्ते अध्यक्ष कन्हैया मंत्री , सचिव हेमंत शर्मा, निलेश अग्रवाल,मीडटाउनच्या अध्यक्ष अंजली मंत्री, सचिव डॉ प्राची अग्रवाल साधू वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव, सलील जैन, सुशील ढगे,गिरीश वीरानी,कोमल शर्मा,यांच्या प्रमुख करण्यात आले.
यावेळी संजय पालीवाल,अजय मल, राजेश अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तर शिबिराच्या यशस्वीते करिता सचिन अग्रवाल, हिमांशू चांडक, अंजु अग्रवाल, दीपिका टावरी,दीपा शर्मा, मेघा गांधी, नीरज गांधी,राहुल टावरी, आकाश चांडक, गिरीश नथ्थानी, राजेश मोहता, ओम शर्मा, किशोर पालिवाल, दीपक अग्रवाल, डॉ पूर्वा चांडक,
शुभांगी जेठा, रुपाली डांगरा, अर्पिता अग्रवाल, रश्मी केला,ऍड उमा भट्टड, ऍड तृप्ती डागा,यांच्यासह इरा हॉस्पिटल व हींलिंग हॅन्ड्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपी च्या चमुने परिश्रम घेतले. सदर शिबिराचा शेकडो दिव्यांगांनी लाभ घेतला.