अकोला – भारतीय सैन्यदल, वायूदल, नौदलातील अधिकारी पदाच्या भरतीच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रातर्फे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) परीक्षेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी नाशिक येथे दि. 20 ते 29 मे हे विनामूल्य प्रशिक्षण होईल. प्रशिक्षणार्थींना विनामूल्य प्रशिक्षण, निवास व भोजन आदी सुविधा दिल्या जातील.
कोर्ससाठी निवड होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी दि. 15 मे रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर एसएसबी-57 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करून त्याची प्रत व माहिती सोबत आणावी.
या प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळण्यासाठी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण असावे किंवा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. किंवा एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असावा व एनसीसी ग्रुप मुख्यालयाने शिफारस केलेली असावी.
किंवा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉललेटर असावे किंवा विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल सेंटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक यांच्याशी [email protected] या ई-मेलवर किंवा (0253) 2451032 किंवा व्हाटसॲप क्र. 9156073306 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.