शेगाव – एमपॉवर फिजियोथेरेपी क्लिनिकच्या वतीने शेगावात मोफत फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी शेगावात शिवनेरी चौक येथील डॉ. राजेश सराफ हॉस्पिटलच्या कंपाउंड मधील एमपॉवर फिजियोथेरेपी क्लिनिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजियोथेरेपी व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मानदुखी, कंबर दुखी, सांधे दुखी फिजीयोथेरेपी, गुडघे दुखी,वात, संधीवात, लकवा, चेहऱ्याचा लकवा, सांधे बदलानंतरचे व्यायाम, फिजियोथैरेपी मशीन आणी ड्राई कपिंग द्वारे होणार.
व्यायामासाठी मार्गदर्शन पण करणार . गर्भाशय पिशवीचा आजार, त्वचा रोगाचे आजार (मुरुम, वांग, चेहऱ्यावरचे डाग ) प्रसुतीपूर्व वा प्रसुतीनंतर तपासणी, पाळी जातांना वा गेल्यानंतर होणारे बदल या साठी मोफत तपासणी होणार मोफत बी.पी. आणि शुगर तपासणी, कॅल्शीयम आणि मल्टी व्हिटॅमीन ची औषधे, हाईट, वजन व बीएमआय तपासणी होणार आहे.
शिबिरामध्ये डॉ. प्रियल चांदुरकर BHMS, PGDEMS स्त्रीरोग वा त्वचारोग तज्ञ आणि डॉ. हुमेरा तबस्सुम (BPTh (MUHS, Nashik) कंसल्टंट फिजियोथेरेपिस्ट) यांच्यासह तज्ञ डॉक्टर्स रुंगांची तपासणी करणार आहे.
शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारची फी नसून रुग्णांसाठी अगदी मोफत तपासणी व औषधोपचार केल्या जाणार आहे. फक्त यासाठी या 9309296045, 8080819286 क्रमांकावर रुग्नांना नोंदणी करावी. या शिबिराचा लाभ रुग्णानानी घ्यावा असे आवाहन एमपॉवर फिजियोथेरेपी क्लिनिकच्या संचालिका डॉ. हुमेरा तबस्सुम यांनी केले आहे.