Monday, December 23, 2024
Homeसामाजिककोगनोळी येथे दि.२२ रोजी मोफत नेत्ररोग शिबिर...

कोगनोळी येथे दि.२२ रोजी मोफत नेत्ररोग शिबिर…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रजावाणी फौंडेशनचे संस्थापक कै. नारायण बिरु कोळेकर यांच्या व्दितीय पुण्यस्मरणिनिमित्त गुरुवार दि.22 रोजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन कोगनोळी येथे सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 पर्यंत प्रजावाणी फौंडेशन आणि कल्लोळी इन्स्टिटयुट आँफ हेल्थ केअर सर्विसेस संचलित कल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे.

या शिबिरात डोळयाचे नंबर तपासणी करून अल्पदरात डोळयाच्या नंबरचे चेष्मे देण्यात येणार आहे.त्याचबरोबर नेत्रतज्ञामार्फत नेत्र रुग्णाची तपासणी करून नेत्रउपचार व शस्त्रक्रिया कल्लोळी नेत्रालय सांगली येथे करण्यात येणार असुन बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहे.या शिबिराचा कोगनोळी व परिसरातील गरजु रूग्णांनी लाभ घ्यावा असे अहवान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: