Monday, December 23, 2024
Homeराज्यनवरात्र उत्सव निमित्त महिलांना मोफत महालक्ष्मी जोतीबा दर्शन...

नवरात्र उत्सव निमित्त महिलांना मोफत महालक्ष्मी जोतीबा दर्शन…

सांगली – ज्योती मोरे

प्रभाग क्रमांक 1 मधील यशवंतनागर, वसंतनगर, दत्तनगर, आंबा चौक, अहिल्यानगर, नवरात्रीनिमीत्त महालक्ष्मी दर्शन, व जोतिबा दर्शनासाठी यशवंत नगर मराठा चौक येथून राज्य परिवहन मंडळाच्या 4 बस सोडण्यात आल्या. सालाबादप्रमाणे सामाजीक बांधिलकी म्हणून प्रभागातील 225 महिलांसाठी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन, व जोतिबा दर्शन,

पन्हाळा गड दर्शनाची मोफत सोय भाजपचे जिल्हा सचिव व आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंच अध्यक्ष श्री. विश्वजीत पाटील यांच्या मार्फत करण्यात आले होते. या उपक्रमाचे शुभारंभ नारळ फोडून आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ यांनी केले यावेळी प्रवासातील असंख्य महिला व नागरिक व मित्र परिवार उपस्थित होते.

या वेळी दर्शनानंतर महिलांनी केलेल्या उपक्रमाचे स्वागत केले व धन्यवाद दिले यावेळी महिलांनी प्रतिक्रिया देताना यशवंतनगर परीसरातील महिलांना दर्शनासाठी यशवंतनगर ते सांगली बस स्टँड ते कोल्हापूर बस स्टँड ते जोतिबा बस बसबदलून जावे लागते यासाठी विश्वजित पाटील यांनी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली व देवदर्शनासाठी उत्तम सोय केली त्याबद्दल आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: