Sunday, September 22, 2024
Homeव्यापार१ जून ला लॉयड मेटल्स एंड एनर्जी कंपनी तर्फे मोफत हेल्मेट वाटप...

१ जून ला लॉयड मेटल्स एंड एनर्जी कंपनी तर्फे मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम…

सिने अभिनेत्री नक्षत्रा उपस्थित असणार…
आ.धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती…

अहेरी – सुरक्षा सप्ताह निमित्य गुरुवार 1 जून रोजी लॉयड मेटल्स एंड एनर्जी कंपनी लिमिटेड तर्फे 1 हजार मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आलापल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.

भव्य हेल्मेट वाटप कार्यक्रमात उदघाटक आमदार धर्मराव बाबा आत्राम राहणार असून अध्यक्षस्थानी गुजरात येथील सेवानिवृत्त डीजीपी एस. खांडवावाला राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री नक्षत्रा मेढेकर तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांची असणार आहे.

1 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता वीर बाबूराव शेडमाके चौक, आलापल्ली येथे मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम असून दुचाकी वाहन चालकांनी चालक परवाना व आधार कार्डचे झेरोक्स प्रत 31 मे पर्यंत आलापल्ली ग्राम पंचायतीत जमा करून आपल्या नावाची नोंदणी करून मोफत हेल्मेट वाटपाचे लाभ घेण्याचे आणि भव्य मोफत हेल्मेट वाटपाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: