Sunday, December 22, 2024
Homeराज्यभिलेवाडा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

भिलेवाडा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

रामटेक – राजू कापसे

दिनांक:- २८ जुलै २०२४ रोजी भिलेवाडा,ता.रामटेक येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप भिलेवाडा येथे आयोजित करण्यात आले होते.साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.

या शिबिरात एकूण-१२८ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२३, व चष्मे करिता-१०५, लाभार्थी यांनी लाभ घेतला..या कार्यक्रम प्रसंगी ग्राम पंचायत भिलेवाडा येथिल सरपंच उमाताई सूर्यभान ढोके,उपसरपंच गोपीचंद खडसे,नरेश ब्राह्मणकर,राजेश कातुरे,सुभाष गांदेकर,रुपचंद निमरड,अजय तीवाडे,सिद्धार्थ ढोके,सुंदरबाई ढोके,महानंदा कोयपरे,सुरेश चौधरी,निखिल कडू व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: