रामटेक – राजू कापसे
शितलवाडी(परसोडा),ता.रामटेक येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर शितलवाडी(परसोडा) येथे आयोजित करण्यात आले होते. महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण-३२३ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-५६, व चष्मे करिता-२६७ लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी ग्राम पंचायत सितलवाडी येथिल सरपंच जयश्री मडावी,शिवसेना रामटेक तालुका महीला आघाडी प्रमुख रश्मी काठीकर, माजी सरपंच धर्मराज राहाटे,उपसरपंच प्रज्वलजी गेचूडे,संजय येनूरकर ,अतुल यादव, अभिजित सरोदे,किशोर सहारे,स्वाती लोणारे,वैशाली सावरकर, नलिनी पराते,दिशा बालपाडे,निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.