Sunday, December 22, 2024
Homeराज्यरेवराल येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

रेवराल येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

रामटेक – राजु कापसे

दिनांक:- १८ मे २०२४ रोजी रेवराल,ता.मौदा येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत
अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर रेवराल येथिल ग्रामपंचायत कार्यालय बचत भवन परिसर येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.

या शिबिरात एकूण-२६६ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-५७, व चष्मे करिता-२०९ लाभार्थी यांनी लाभ घेतला.. व तसेच ८६ लाभार्थी यांचे आयुष्यमान भारत कार्ड करिता नोंदणी करण्यात आली..

या कार्यक्रम प्रसंगी मनोज कोठे,चिंतामन मदनकर,कैलाश पटिये,गोपाल ठोंबरे,रविंन्द्र कोठे,मारोती मदनकर,बबलु आग्रे,सागर पटिये,आप्पा कोठे,देवू आकरे,श्यामराव मस्के,हरीशचंद पारधी ,निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: