मूर्तिजापूर – तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी शाखा मूर्तिजापूर मार्फत ग्यानेश्वर खंडुजी वाघमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोयनका नगर मूर्तिजापूर येथील कार्यालयाच्या प्रांगणात मोफत भव्य डोळे तपासणी शिबिर व चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी विविध गावातून शेकडो गावकऱ्यांनी हजेरी लावली.
सर्वप्रथम महापुरुषांना वंदन करून दिप प्रज्वलन करण्यात आले व नंतर उद्योजक बु.ग्यानेश्वर खंडुजी वाघमारे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याबरोबरच प्रमुख उपस्थिती व्ही आर कांबळे,अरविंद तायडे, सुरेश जोगळे, प्रशांत इंगळे, सुनील वानखडे, विष्णूदास मोंडोकार,ॲड.संजय सेंगर, श्रीकांत पिंजरकर,संजय भारंबे,के.आर.साऊतकर,अनिल चव्हाण,जया भारती,विशाल शिंदे,
वंचित घटकांतील जे कुटंब आहेत,जे दुर्बल घटकातील लोक आहेत, अशा लोक शासकीय योजनेपासून वंचित असतात.
म्हणून सुगत वाघमारे ह्यांनी शिबिरादरम्यान सांगितले की डोळा हा माणसाचा मुख्य अवयव आहे त्यामुळे हे डोळे तपासणी शिबिर जनतेसाठी घेण्याचे ठरविले होते ,त्याबरोबर जे चष्मे विकत घेऊ शकत नाही, अशांना मोफत चष्मे वाटप करण्याचे ठरविले होते. ते आज शिबिराच्या माध्यमातून पुर्ण होत आहे.
बाल व वृद्धांसाठी विशेष व्यवस्था या शिबिरात करण्यात आली होती. ज्यांना डोळ्यांचे ऑपरेशन शिबिरातील वैद्यकीयांने सांगितले त्यांना ऑपरेशन करून देऊ असे ते म्हणालेत. पुढे असे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेत राहू असे मा. सुगत वाघमारे यांनी सांगितले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रतन हिरोडे,मिलिंद इंगळे,मनिषा तायडे,हर्षदा डोंगरे,सविता हिरोडे,क्रिष्णा घ्यारे,निखिल किर्दक, अभिजीत देशमुख, आदेश महाजन, सुरेश थाटे, प्रेमदास समदुरे, बाळू गवई, प्रमोद वानखडे, सिध्दार्थ वानखडे, हृषिकेश अनभोरे,पुनाजी खंडारे,रुपेश काळे,आकाश वानखडे, मंगेश वाडेकर, यांनी परिश्रम घेतले.