पुणे – राजनंदिनी स्मृती फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील हडपसर भेकराईनगर येथे दिवेघाट मार्गे पंढरपूर कडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, मुक्ताई पालखी, संत तुकाराम महाराज पालखी तसेच मार्गावरील दिंड्यांना सिडबाॅल्स झाडांच्या बिया, कोय इत्यादि वारकऱ्यांना देऊन पर्यावरण पूरक जनजागृती संदेश वारकऱ्यांना देण्यात आला.
महाराष्ट्र मधील अमरावती येथील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारी इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु क्षमता ठाकूर हिने मागील महिन्यात 5 जून ला विश्व पर्यावरण दिनानिमित्त “एक लक्ष सीड बॉल्स” बनविण्याचा व ते नीशुल्क वितरणाचा संकल्प केला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून या आव्हानाला प्रतिसाद देत यवतमाळ, वर्धा ,नागपूर, अकोला, परभणी ,हिंगोली, सोलापूर ,जळगाव, धुळे ,नाशिक ,जालना , बुलढाणा ,पुणे आदी जिल्ह्यातील पर्यावरण मित्र सभासदांकडून उत्सफूर्त पणे कडुलिंब ,जांभूळ, चिकू ,सीताफळ, आंबा इत्यादीच्या बियापासून तयार केलेले सीड बोल्स सर्वांनी एकत्रित आणून ते स्मृती रथात गोळा केले आणि सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत दिंडी मधील हजारो वारकऱ्यांना निशुल्क वितरित करून त्यांना सांगितले गेले की दिवे घाट मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला ओलसर मातीत दोन-तीन इंच गड्डा करून हे सीडबॉल त्यात टाकावे किंवा जंगलात फेकावे,
पावसाच्या पाण्याने येणाऱ्या फक्त आठ ते पंधरा दिवसातच यामधून रोपे निघतील व पुढल्या वर्षी पालखीत येताना तुम्हाला त्याचे रूपांतरण मोठ्या वृक्षात दिसेल, पर्यावरणाच्या क्षेत्रात आपले सुद्धा हातभार लागत आहेत आणि पालखी मार्गाने पहिल्यांदा आपल्या हातून वृक्षारोपण होत आहे हे कळताच वारकरी अतिहर्षित झाले सोबतच त्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल आणि उपवासाचे पदार्थही देण्यात आले. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान हा जागतिक चिंतेचा विषय बनलेला आहे या वाढत्या तापमानाला आळा घालण्याकरिता पर्यावरणाचे रक्षण संवर्धन काळाची गरज असून यासाठी सर्वांनी एक तरी झाड लावावे हा संदेश लाखो वारकऱ्यांना देण्यात आला.
पर्यावरणाच्या क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या राजनंदनी स्मृती फाउंडेशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या गतवर्षी अकोला, अमरावती ,पंढरपूर, परतवाडा इत्यादी ठिकाणी झालेल्या शिव महापुराण कथेमध्ये आपल्या सर्व सभासदांना नेऊन प्लास्टिक मुक्त देशाच्या संकल्पनेवर जनजागृती करण्यात आली व तसेच लाखो भाविक भक्तांकडून केलेल्या प्लास्टिक कचऱ्याला संकलित व एकत्रित करून त्याची विल्हेवाट करण्यात आली या उपक्रमास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता.
पालखीत वारकऱ्यांना निशुल्क सीड बॉल्स वितरणाच्या या अभिनव उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक राजसिंह चंदेल, संतोषसिंह ठाकूर, सौ सारिका चंदेल, नरेंद्र सिंह ठाकुर, कलशेट्टी सर तसेच ग्रीन काउंटी फेज एक मधील चेअरमन हाके सर, गोयल मॅडम, भारती माळी, राधासिंग ,सोमा भुमीक, जयमाला शुक्ला, पूजा तिवारी, कदम, निकिता बोधे, नाईक ,श्री शा ,ईती पाटील, मेघा गजम, रितु मिश्रा ,यामिनी, पावनी रमया स्वाती दुबे, कोरपड सर, श्वेता लाल आदींनी विशेष सहभाग नोंदवला तसेच यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया टीम चे श्री गणेश कराड विशेष उपस्थित होते, केवळ एक महिन्याच्या कालावधीत आपणा सर्वांच्या सहकार्याने आम्ही एक मोठी संकल्पपूर्ती करू शकलो याकरिता अमरावती वरून कु क्षमता ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले