Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | निशुल्क घडले राम धामचे दर्शन...

रामटेक | निशुल्क घडले राम धामचे दर्शन…

रामटेक – राजू कापसे

पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुलभातील कोलीतमारा गावा जवळ ढवलापूर हे गाव आहे त्यांनी रामधाम तीर्थ क्षेत्रा विषयी खूप नाव ऐयकल होत पण ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात अस्या परिस्थितीत त्यांना पर्यटना करीता रामधाम इथे जायचं ठरविल्याने मजुरीतील पैसे वाचवून 95 पर्यटक हे रामधाम येथे फिरण्याकरिता आले ते पर्यटक रामधाम येथील तिकीट घर येथे आले.

तेव्हा तिथे त्यांनी आमी ढवलापू ला राहतो असे सांगितले काही पैसे कमी कराल काय अशी विचारणा केली तेवडयात रामधाम चे संस्थापक चंद्रपाल चौकसे तिकीट घराजवळून ऑफिस कडे जाण्यास निघाले तेवा त्यांनी विचारल कुठे राहता तर त्यांनी सांगितले ढवलापूर तेवा श्री चंद्रपल चौकसे यांनी त्यांना आपल्या ऑफिस मध्ये घेऊन गेले व त्यांना चहा पाणी करून पूर्ण रामधाम व लाईटहाऊस वॉटर पार्क निशुल्क फिरायला सांगितले एवढच नव्हे तर त्यांचा जेवणाची पण वेवस्था करून दिली त्यांनी असे सामाजिक कामात अग्रेसर असलेले श्री चंद्रपाल चौकसे नेहमीच गोरगरीबांची मदत करीत असतात.

बर्ड पार्क, ऍडव्हेंचर पार्क वॉटर पार्क चा भरपूर आनंद घेतला दिवसभर आमी मजा केली व आम्हांला साहेबांनी घरी जातेवेळी जेवण पण दिले, तिकीट चे पैसे पण घेतले नाही आणि आमला उद्योग गा विषयी माहिती दिली तिथे फिरायला आलेल्या दोन इंजिनियर शिकत असलेल्या मुलींनी पण आमच्या मुलाला शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले एवढच नाही तर आमाला चौकसे साहेबांनी भेट वस्तू पण दिल्या आमाला वाटतं नव्हतं एवढं काही आमाला भेटणार म्हणून खूप आनंद झाला असे मत ढवलापूर येथील ज्योती भलावी यांनी वेक्त केले. यावेळी ढवलापूर येथील पर्यटका च्या चेहऱ्यावर प्रफुलीत हास्य गगनमावेसे झाला होता.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: