Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक येथे निशुल्क आयुर्वेद चिकित्सा शिबीर संपन्न; ३५० लोकांची मोफत तपासणी व...

रामटेक येथे निशुल्क आयुर्वेद चिकित्सा शिबीर संपन्न; ३५० लोकांची मोफत तपासणी व औषध वाटप…

रामटेक – राजु कापसे

गुरुवर्य वैध प्र ता जोशी(नाना) यांच्या स्मुर्ती पितर्थ्य प्रभा फॉंडेशन, महाराष्ट्र व रामटेक आयुर्वेद डॉक्टर असोसिशन रामटेक यांच्या संयुंक्त विध्यमानाने निशुल्क आयुर्वेद शिबीर रामटेक येथील रामलेशवर मंदिर येथे ३५० लोकांची मोफत तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. शिबीर कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य वैध प्र ता जोशी(नाना) यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैध दलात्र्य दगडगाव,वैध नितीन मेशकर, वैध विराज गित,वैध कमीत नवानकर, डॉ प्रेम डुके, डॉ सुधीर नाखले,डॉ शशिकांत मालधारी उपस्थित होते.संचालन डॉ गजेंद्र बरबटे, डॉ गणेश चोले, डॉ मयूर डाखोरे,डॉ प्रद्या आरणकर यांनी केले.या शिबिरात डॉ वाघमारे,डॉ शरयू राहटे,डॉ योगेश राहटे,डॉ पौर्णिमा लोधी,डॉ शुभांगी चकोले, श्रेया वणवे डॉ प्रिया राऊत,डॉ अंशुजा किंमतकर, ,डॉ प्रवीण चमत,डॉ निलेश परीने,डॉ स्वरणा बागडे,डॉ प्रकाश गणावार,डॉ सर्फराज,डॉ ज्योती सरोदे यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरात मोफत अग्निक्रम,विध कर्म, सिरव्यधन कर्म व पंचक्रमातील इतर उपचार पद्धती व रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ आदर्श गायकवाड यांनी केले.*प्रथमच रामटेक येथील आयुर्वेद डॉ नी अशी मोफत तपसानी करून औषध वाटप सेवा दिल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.डॉ गजेंद्र बरबटे यांच्या कडून औषध वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: