Monday, December 30, 2024
Homeराज्यमोबाईल वर कॉल करून माहिती घेऊन खात्यातील ६१,७४,००० हजार रुपये काढून फसवणूक...

मोबाईल वर कॉल करून माहिती घेऊन खात्यातील ६१,७४,००० हजार रुपये काढून फसवणूक…

सावळा येथील घटना

धामणगाव रेल्वे – सावळा येथे राहणार भूषण निळकंठ गोडे वय वर्ष 65 यांची अनोळखी इसमाने मोबाईलवर कॉल करून माहिती घेऊन खात्यातील 61 लाख 74 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

भूषण गोडे यांना मोबाईलवर अनोळखी इसमाने कॉल करून तसेच व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून तुम्ही चौकशीसाठी हजर रहा असे म्हणून भूषण गोडे यांची चौकशी करून व त्यांच्या कुटुंबाची संपत्ती व शेअर्स तसेच सर्व बँक खात्यातील माहिती घेऊन अनोळखी त्या इसमाने खात्यातील 61 लाख 74 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भूषण गोडे यांनी दत्तापूर पोलीस स्टेशन येथे त्या अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दिली आहे. तेव्हा दत्तापूर पोलिसांनी विविध कलमान्वे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: