Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | चारचाकी - दुचाकीमध्ये धडक, एकाचा मृत्यु तर एक जखमी...

रामटेक | चारचाकी – दुचाकीमध्ये धडक, एकाचा मृत्यु तर एक जखमी…

रामटेक – राजू कापसे

रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक- तुमसर महामार्गावरील बोरी-शिरपूर शिवारात २ ऑगस्ट २०२३, बुधवारच्या सकाळी ११.०० वाजता रामटेक कडुन तुमसर कडे जाणाऱ्या टाटा-सुमो क्रमांक एम.एच.२९ व्ही ९८८४ आणि तुमसर कडुन रामटेक कडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.४० बी.एन.४८८७ मध्ये आमोरासमोर धडक झाली. घटनेत दुचाकीवरील एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.

ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल चालक विलास धर्मेंद्र टेंभरे ,वय २६ वर्ष राहणार- देवटोला, गोंदिया याचा जागीच मृत्यू झाला तर मोटर सायकलवर मागे बसलेला सुमित मुलचंद हरीनखेडे वय-२५ वर्ष हा गंभीररित्या जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सुमितला रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर मेडिकल कॉलेज नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. रामटेक पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: