नांदेड – महेंद्र गायकवाड
महाराष्ट्रातील अठरा लोकांना निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले असून निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीत जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे या चौघाना आता निवडणूक लढविण्यात येणार नाही.
देशात व राज्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत महाराष्ट्रातील एकूण अठरा जणांचा समावेश आहे.
निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.
या यादीत जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुदसरुदिन अलिमुदिन, लोहा मतदार संघातील पांडुरंग टोलाबा वान्ने, किनवट विधानसभा मतदारसंघातील विशाल दत्ता शिंदे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील इम्रान बशर यांचा समावेश आहे.