सांगली – ज्योती मोरे
कृष्णा नदीच्या उगमापासून ते राजापूर बंधाऱ्यापर्यंतचा प्रवासा मध्ये नदी प्रदूषित करणाऱ्या नऊ मोठ्या कारखान्यांपैकी चार कारखाने हे एकट्या जयंत पाटलांचे असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव पैलवान पृथ्वीराज पवार यांनी केला.
दत्त इंडिया आणि स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड यांनी मळी मिश्रित केमिकल युक्त पाणी सोडल्याने सांगलीतील कृष्णा नदीतील मासे मेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यावर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा ने तपास करून सांगलीतील वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखान्यातील दत्त इंडिया शुगर सह स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड ला दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.परंतु कृष्णा नदीच्या उगमापासून ते राजापूर बंधाऱ्यापर्यंतच्या कृष्णेच्या 280 किलोमीटरच्या प्रवासात ज्या नऊ कारखान्यांचे दूषित पाणी मिसळले जाते, त्यापैकी चार कारखान्यांचे पाणी हे एकट्या जयंत पाटलांच्या कारखान्यातून मिसळले जाते,असा आरोप पृथ्वीराज पवार यांनी केली.
दरम्यान या विरोधात 25 मार्च रोजी सांगलीत मानवी साखळी करणार असून,त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात दिलेला अहवाल घेऊन शिष्टमंडळासह मंत्रालयावर धडक मारणार असल्याचं, तसेच गरज भासल्यास रेल्वे भरून जाऊन मुंबईतील आझाद मैदानावर सांगलीकर ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही पवार यांनी बोलताना दिला आहे.