किड्स पॅराडाईज च्या महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पातुर – निशांत गवई
पातूर येथील किड्सपॅराडाईज पब्लिक स्कूलच्या चारशे विद्यार्थ्यांनी स्वराज्यरक्षक राजा शिवछत्रपती हे महानाट्य सादर करून शिवरायांचा इतिहास पातूरकरांसमोर उभा केला. या ऐतिहासिक महानाट्याला पातूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये फन -डे 2022 या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. तर हॉरर या आगळ्या -वेगळ्या नृत्यविष्काराने प्रेक्षकांना वेगळ्या अनुभूतीचा आनंद दिला.
या महोत्सवाला अध्यक्ष म्हणून श्रीमती सरस्वती गाडगे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनिष हिवराळे, ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयचे कार्यकारी संचालक डॉ. साजिद शेख, पातुरचे पोलीस उपनिरीक्षक माजीद खान पठाण, सिदाजी महाराज संस्थाचे विश्वास्थ प्रा. विलास राऊत, एबीपी माझा चे जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे, झी चोवीस तास चे जिल्हा प्रतिनिधी जयेश जगड, आज तकचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय साबळे, महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश काळे, सौ. प्रांजली काळे,किड्स पॅराडाईजचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे पत्रकार सतिष सरोदे , राहुल वाघमारे यांना तर राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून पातुरला नावालौकिक मिळवून देणारे खडकेश्वर गणेश मंडळाला मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले तर संचालन कु. प्रणाली घुगे, कु श्रेया तेलंगडे यांनी केले.
यांनतर स्वराज्यरक्षक राजा शिवछत्रपती हे महानाट्य चिमुकल्यानी सादर केले. चिमुकल्या विदयार्थ्यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जिव ओतला होता शिवरायांच्या जन्मापासून तर राजयभिषेक सोहळ्यापर्यंत चा इतिहास विदयार्थ्यांनी हुबेहूब साकारला. अभिनय, रंगमंच प्रकाशव्यवस्था यामुळे हा सोहळा पातूरवासियांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, वंदना पोहरे, नितु ढोणे,
अविनाश पाटील, नरेंद्र बोरकर, अश्विनी अंभोरे, पल्लवी खंडारे,शीतल कवडकर, लक्ष्मी निमकाळे, भारती निमकाळे, योगिता देवकर, नयना हाडके, पल्लवी पाठक, प्रियंका चव्हाण, हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव, कल्पना इंगळे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले. प्रकाशव्यवस्था सुनील पाटील, साउंड व्यवस्था संतोष लसनकर, तांत्रिक सहकार्य मधुकर बोडदे, संगणकप्रणाली पार्थ वानखडे, प्रेम मानकर, आदींनी सहकार्य केले.