सांगली – ज्योती मोरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बाबा सप्लायर्सचे मालक लालसाब मुल्ला यांच्या खुनातील चौघांना अंकली हरिपूर रस्त्यावर आज अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश आले आहे.पैकी एक जण अल्पवयीन आहे.
यामध्ये सनी सुनील कुरणे वय वर्षे 23 राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, विशाल सुरेश कोळपे वय वर्षे वीस राहणार लिंबेवाडी तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली,स्वप्निल संतोष मलमे वय वर्ष 20 राहणार खरसिंग तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली, आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिली.
दरम्यान हा हल्ला करण्यासाठी आरोपींनी एक दिवस आधी रेकी केल्याचेही सांगण्यात आले. 2019 मध्ये झालेल्या एका खुनाच्या आरोपाखाली मोकांतर्गत जेलमध्ये असलेल्या सचिन डोंगरे राहणार सांगली याचा जामीन न होऊ देण्यासाठी, तसंच त्याला बाहेर येता येऊ नये यासाठी, नालसाब मुल्ला हा प्रयत्न करत असल्याने, सचिन डोंगरचा जामीन होत नसल्याचा राग मनात धरून सचिन डोंगरे च्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली आरोपीनी दिली आहे.
यामध्ये स्वप्निल मलमे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. सदर संशयीतांना विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गायकवाड, पोलीस नाईक, संदीप नलावडे, विनायक सुतार, विशाल कोळी,अरुण औताडे आमसिध्द खोत, अमोल लोहार आदींनी केली.