Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन...

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन…

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. आज सकाळी ९.३९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह शेखावत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आज वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

देवीसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत. त्यांनी यापूर्वी राजस्थानचे पहिले गृहस्थ आणि अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी 6 वाजता पुणे येथे करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: