न्यूज डेस्क – कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयाने माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेलं हे १३ वं प्रकरण आहे.
याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांनाही तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.