नांदेड – महेंद्र गायकवाड
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध पक्षातील आजी -माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्यासह नांदेड शिवसेना उबाठा गटातील जिल्हाप्रमुख माधव पावडे, तालुकाप्रमुख गणेश शिंदे,
जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख अभिजीत भालके, ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी तसेच भोकरचे दादाराव ढगे आदी मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी अजित दादा पवार म्हणाले की,मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या भक्कम साथीनं पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनसेवेत तुमचा सुद्धा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला