Monday, December 23, 2024
Homeराजकीयशिवजयंती कार्यक्रमासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून तरुणांना आर्थिक मदत...

शिवजयंती कार्यक्रमासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून तरुणांना आर्थिक मदत…

राजपुर पॅच व बोरी येथील तरुणांना शिवजयंती कार्यक्रमासाठी आर्थिक मदत…

आलापल्ली तालुक्यातील राजपुर पॅच व बोरी येथील तरुणांनी शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची त्यांच्या आल्लापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन शिवजयंती कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगले.

यावर माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी मदतीचे हात पुढे करीत आपल्या परीने राजपुर पॅच व बोरी येथील तरुणांना शिवजयंती कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी आर्थिक मदत दिली. यावेळी रामलू कुडमेथे माजी सरपंच ग्रामपंचायत राजपूर पॅच, संतोष पुरषोत्तमवार, साजन खांडरे, अक्षय मोहुर्ले, सचिन झाडे, अजय मोहुर्ले, शोएब पठाण, आकाश गुरुनुले, कार्तिक सोर्लावार, चिरंजीव पेरगू, क्रिष्णा पोहणकर, प्रवीण मंचरलावर, सलीम शेख, आदर्श उपटलावर, सिद्धार्थ झाडे, अनिकेत उपटलावर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: