Monday, December 23, 2024
Homeखेळअहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक...

अहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन…

जय विसारुंगा क्लब कडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

अहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथे जय विसारुंगा क्लब कडून आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पेरमिली माजी सरपंच प्रमोद आत्राम तर प्रमुख पाहुणे येरमणार उपसरपंच विजय आत्राम,पोलीस पाटील काटा केसा आत्राम,मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी,पेरमिली माजी उपसरपंच साजन गावडे,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,कवीश्वर चंदनखेडे, गाव भूमिया वारलुजी मडावी,येरमणार पोलीस पाटील डोलू मडावी,

येरमणार ग्राप सदस्य कैलास झाडे,रामाजी आत्राम,बंडे कुळमेथे,मासा गावडे,चैतु वेलादी,इरपा आत्राम,डोलू आत्राम,राजू तलांडे,मादी आत्राम,देवू गावडे,योगेश कोंडागुर्ले,प्रशांत दुर्गे,केसा तलांडी,देसू तलांडी,रमेश आत्राम सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम व तृतीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यासह सामन्यासाठी इतर मान्यवरांकडून आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले. गुर्जा खुर्द येथील जय विसारुंगा क्लब कडून आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी मंगेश वेलादी,मालू तलांडी,विजय वेलादी,जोगा आत्राम,विजय आत्राम,चिंन्ना तलांडी यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश कोंडागुर्ले यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला गुर्जा खुर्द सह येरमणार परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: