अहेरी – मिलिंद खोंड
तेलंगाणा राज्यातील शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सोमनी येथे नुकताच महामानव,भारतरत्न, बुद्धीसम्राट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तेलंगान प्रदेशातील शिरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कोनेरू कोंनप्पा यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची होती.यावेळी बौद्ध भिखु बुद्धचरणजी,भन्ते धम्म विजय,भिक्षुनी खेमा थेरी, भिक्षुनी सुबोधिमाता यांची विषेश उपस्थिती होती.
**महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी होते.
आपल्या देशातील राजकीय,सामाजिक , सांस्कृतिक व आर्थिक स्थिती याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून वेळो-वेळी देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला.आज देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आहे.
त्यांचे विचारच देशाला तारु शकतात असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होते. देशाला एकसंघ ठेवायचे असेल व विकासाचे मार्गावर न्यायचे असेल तर राज्यकर्त्यांनी संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी.देश आपोआप विकासाचे मार्गावर येईल.
भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे.सर्व जाती धर्माचे लोकांना समान न्याय व हक्क संविधानाने दिले आहेत.सर्वांना एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य केवळ संविधानातच आहे.म्हणून संविधान रक्षणाची जबाबदारी आम्हा सर्वाची आहे.
असे मार्गदर्शन शिरपुरचे आमदार कोनेरु कोनप्पा यांनी केले.ते पुतळा अनावरण प्रसंगी उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य मधुकर डोंगरे,जि.प.सदस्य पुष्पलता पंधराम ,प.स.सदस्य विश्वनाथ भसारकर,सरपंच शारदा वेलादी,बिआरएस पार्टी तालुकाध्यक्ष सखाराम सिडाम सह परिसरातील हजारोच्या संख्येने दलित समुदाय उपस्थित होते.