अकोला जिल्ह्यातील घुंगशी येथील रहिवाशी व अकोला शहरातील जठार पेठ येथे वास्तव्यास असलेले माजी आमदार विठ्ठलराव् उर्फ व्ही एन पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आज १८ डिसेंबर ला पहाटे ५.३० वाजता आजारानंतर दुःखद निधन झाले. ते माजी राज्यमंत्री डॉ रणजित पाटील वडील असून राजेंद्र, नितीन,रणधिर, राहुल यांच्या सह मोठा आप्त परिवार आहे. माजी आमदार व्ही एन पाटील हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते.
ज्येष्ठ नेते स्व. नानासाहेब वैराळे यांनी त्यांना अकोला बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काँग्रेस ची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत व्ही एन पाटील बहुमताने विधान परिषद सदस्य , आमदार म्हणून निवडून आले होते, शांत स्वभाव असलेले व्ही एन पाटील हे पट्टीचे फुटबाल पटू होते, अनेक फुटबाल टूर्नामेंट मध्ये त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. सदैव गोड बोलणारे व्ही एन पाटील राजकारणा सोबत च क्रीडा क्षेत्रात सक्रिय होते.
माजी आमदार व्ही एन पाटील यांच्या निधनाने एक समंजस नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे , त्यांची अंत्ययात्रा आज १८ डिसेंबर ला दुपारी ३ वा त्यांच्या जठारपेठ येथील निवास स्थाना हून निघून उमरी मोक्ष धाम मध्ये त्यांचे पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येतील असे डॉ रणजित पाटील परिवारा कडून सांगण्यात आले आहे.