अमरावतीचे अपक्ष आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना पहिल्या टप्प्यातील झालेल्या मंत्री मंडळात स्थान दिले गेले नसल्याने बच्चू कडू समर्थक नाराज असल्याची चर्चा होत आहे. तर शिंदे गटातील संजय राठोड यांना स्थान दिल्या गेले. तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्याने त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यासोबतच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना डावलण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे विदर्भातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात दबंग आमदार म्हणून ओळख आहे. त्यांना शिंदे-फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रीपद असल्याची चर्चा होती त्यासाठी व हिदुत्वासाठी त्यांनी राज्यमंत्री पदाला लाथ मारून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सुरत, गुहाहटी ते गोवा पर्यंत सुरुवातीपासूनच यांच्या खांद्याला खांदा लाऊन होते, मात्र आता भाऊच मंत्रिपद डावलण्यात आलं की काय असं काही कार्यकर्त्यांना वाटत जरी असल तरी आता दुसर्या टप्प्यात मंत्रीपदाची माळ भाऊच्या गळ्यात पडणार का? हे पाहणे औत्स्क्याचे ठरणार आहे
आज पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.