Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayमाजी मंत्री बच्‍चू कडू यांनी आमदार रवी राणांवर घेतले तोंडसुख...म्हणाले…

माजी मंत्री बच्‍चू कडू यांनी आमदार रवी राणांवर घेतले तोंडसुख…म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लाऊन सत्तेत सहभागी असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची बडनेरा आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना जीभ घसरल्याने आता पुन्हा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका जाहीर सभेत बोलतांना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले आमदार रवी राणा आणि बच्‍चू कडू यांच्‍यातील वाद चांगलाच पेटला असून रवी राणांना प्रत्‍युत्तर देताना बच्‍चू कडू यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. याआधी रवी राणांनी बच्‍चू कडू यांच्‍यावर “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया..” असे म्‍हणत टीका केली होती. त्‍याला प्रत्‍यूत्‍तर देताना बच्‍चू कडू यांचा तोल गेला आणि त्यांनी… “अबे हरामखोराची औलाद, आम्‍ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्‍या शर्यतीत नसता. आमच्‍यामुळेच तू मंत्रीपदाकडे डोळे लावून बसला आहे.”, अशा शब्‍दात बच्‍चू कडूंनी राणांवर शाब्दिक हल्‍ला चढवला. “आम्‍ही नाचणारे नाही, तर नाचवणारे आहोत.”, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी राणा दाम्‍पत्‍यावर केली आहे.

बच्‍चू कडू यांच्‍या अचलपूर मतदारसंघात दहीहंडी उत्‍सवाच्‍या कार्यक्रमात रवी राण यांनी बच्‍चू कडू यांच्‍यावर टीका केली होती. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, तर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्‍चा शिपाई आहे. बच्‍चू कडू म्‍हणजे सबसे बडा रुपया आहे.”, असे म्‍हणत राणांनी बच्‍चू कडू यांच्‍यावर तोंडसुख घेतले होते. त्‍यावर बच्‍चू कडू यांनी लगेच प्रतिक्रिया देणे टाळले होते, पण आता अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे बच्‍चू कडू यांनी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: