Monday, December 23, 2024
Homeराजकीयगडचिरोली शहरातील समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा...

गडचिरोली शहरातील समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा…

अडचणी यथाशिग्र सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन…

गडचिरोली – सेवा वाकडोतपवार

गडचिरोली शहरातील विविध वार्डातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारी, अडचणी व समस्यांची दखल घेत व त्या समस्या यथाशिग्र मार्गी लावण्यासाठी गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेतली व शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी शहरातील विविध वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने वार्डातील नाली स्वच्छता, दिवाबत्ती, घन कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणीपुरवठा, रस्त्यावरील अतिक्रमण, नागरिकांचे आरोग्य तसेच इतर समस्या जाणून घेऊन त्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली शहरातील रामनगर,

लांजेडा, स्नेहनगर, इंदिरानगर तसेच विवेकानंदनगर ,गोकुळनगर, चनकाई नगर, कॅम्प एरिया, कॉम्प्लेक्स-विसापूर, पंचवटी नगर, हनुमान वार्ड, तेली मोहल्ला इत्यादी वार्डात दौऱ्या दरम्यान अनेक नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी बाबत आपली व्यथा योगीताताई पिपरे यांच्या समोर मांडली असता त्यांची जाण ठेवून व आपली शहरातील समस्यांबाबत जबाबदारी लक्षात घेत सर्व नागरिकांच्या समस्या,

तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या व त्या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यासाठी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेतली व समस्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली व सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: