काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष कृष्णकुमार ऊर्फ दादासाहेब विठ्ठलराव जमादार यांचे रात्री 10 च्या सुमारास निधन झाले, त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. एवढ्या अफाट संपत्तीचा मालक असून अगदी साधी राहणी त्यांची ओळख होती.
त्यांचे वडील स्व. श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी समर्थ रामदासांच्या दासबोधातील मंदीरांचा जिर्णोद्धार करण्याच्या बोधामृताने प्रेरीत होऊन देवरण परीसरात मंदिरे उभारली व असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार केला आणि विशेष म्हणजे स्वतःच्या नावाची कुठेच नोंद ठेवली नाही. त्यांचाच वारसा कृष्णकुमार यांनी जपला होता…
त्यांच्यामागे पत्नी तीन मुले नातू व बराच मोठा परिवार आहे ते काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत सक्रिय राहिले त्यांची अंत्ययात्रा आज दुपारनंतर त्यांच्या राहत्या घरून निघेल…