Om Prakash Chautala : हरियाणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले. माजी मुख्यमंत्र्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी गुरुग्राम येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे प्रमुख होते. त्यांच्या निधनाने राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे.
ओमप्रकाश चौटाला हे हरियाणात ओपी चौटाला या नावाने प्रसिद्ध होते. ते देशाचे सहावे उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1935 रोजी सिरसाच्या डबवली गावात झाला. ते INLD कडून हरियाणाचे मुख्यमंत्री होते. गुरुग्राम मेदांता येथे दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून गेल्या ३-४ वर्षांपासून त्यांच्यावर मेदांता येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना 11.35 वाजता मेदांता येथील इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले. मेदांता प्रशासनाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
ओमप्रकाश चौटाला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी सिरसाच्या चौटाला गावात झाला. चौटाला हे पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. चौटाला 2 डिसेंबर 1989 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 22 मे 1990 पर्यंत ते या पदावर राहिले. 12 जुलै 1990 रोजी चौटाला यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांना दोन महिन्यांत पदावरून हटवण्यात आले. मात्र, चौटाला यांनाही पाच दिवसांनी पदाचा राजीनामा द्यावा लागला. 22 एप्रिल 1991 रोजी चौटाला यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र अवघ्या दोन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.
Former Haryana CM and INLD chief Om Prakash Chautala passes away at his residence in Gurugram: Rakesh Sihag, INLD Media Coordinator
— ANI (@ANI) December 20, 2024
(File photo) pic.twitter.com/3DORlQ338K