Friday, November 22, 2024
Homeराज्यअहेरीत पिण्याच्या पाण्याचा समस्येने नागरीक बेजार, माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव धडकले जीवन...

अहेरीत पिण्याच्या पाण्याचा समस्येने नागरीक बेजार, माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव धडकले जीवन प्राधिकरण कार्यालयावर…

अहेरी नगरात सुमारे दोन वर्षांपासुन पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनी नागरीक हवालदिल झालेले आहेत. गढुळ पाणी,जंत व कृमीयुक्त पाणी पुरवठा होत असते.वेळी अवेळी तेसुध्दा अपर्याप्त पाणी पुरवठा होत असल्याणे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दोन वर्षांपासुन सतत निवेदने देऊन,घेराव करुनही परिस्थितीत किंचीतही बदल झालेला नाही ऊलट समस्या वाढतच आहेत.अभियंता चंद्रपुरला मुक्कामी असतात दोन-चार महीण्यातुन एखादी भेट देत असतात त्यांना विचारणा केल्यास सबबी सांगुन वेळ मारुन चालले जातात.कधी वाढलेले कनेक्शन तर कधी विज पुरवठ्याची अडचन अशी नाना कारणे पुढे करुन हतबलता दर्शवितात त्यामुळे अहेरीतील पिण्याच्या पाण्याची समस्या कधी सुटणार की नाही?अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्रस्त झालेल्या नागरीकांचे लोंढे रोज जिवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर जात आहेत.माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी समस्येची दखल घेऊन तडक कार्यालयावर पोहोचले व तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तेथे आलेल्या महीलांशी सुध्दा संवाद साधुन समस्या जाणुन घेतल्या.

अभियंता कोतपल्लीवार यांचेशी फोनवर संपर्क करुन वाढीव पुरवठ्या संदर्भातल्या अडचणींची माहीती घेतली तसेच आराखडा सादर करायला सांगीतले आणि शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करुन पालकमत्र्यांकडून निधी आणण्याची ग्वाही दिली..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: