नांदेड – महेंद्र गायकवाड
भोकर तालूका पाणी टंचाई आढावा बैठकिचे आयोजन दि.२५ जानेवारी रोजी गणराज रिसोर्ट येथे करण्यात आले होते. या बेठकीस माजी मूख्यमंत्री खा.अशोक चव्हाण व आमदार श्रिजया चव्हाण यांच्यासह शहरातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी शहरातील काही जेष्ठ पत्रकारांची उपस्थिती होती.
बैठक चालू होण्यापूर्वी खा.चव्हाण यांनी ध्वनिक्षेपकांवरुन पत्रकारांना बैठकीतून बाहेर जाण्यास फर्मावले दोन -दोन वेळा ध्वनीक्षेपकावरुन पत्रकारांना बैठकीतून बाहेर जा असे म्हटल्याने नाराज झालेल्या पत्रकारांनी खा.चव्हाण यांनी पत्रकारांबदल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
या निषेधाचे निवेदन महामहिम राज्यपाल यांचेकडे तहसीलदार भोकर यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर एल.ए.हिरे, बि.आर.पांचाळ, राजेश वाघमारे, बाबूराव पाटील, अनिल डोईफोडे, बि.एस.सरोदे, मनोज चौव्हाण, सिध्दार्थ जाधव, शेख लतीफ,अरुण डोईफोडे, जयभिम पाटील, शिवाजी गायकवाड,कमलाकर बरकमकर,
बालाजी नार्लेवाड, शंकर कदम, दत्ता बोईनवाड, अहमद करखेलीकर, श्रीकांत देव, उत्तम कसबे, कैलास कानिंदे, विजय मोरे, गंगाधर नक्कलवाड, सूभाष तेले, शूभम नर्तावार आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.या अवमान प्रकरणाचा निषेध जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवातून होत आहे.