अहेरी – उपवनसंरक्षक आल्लापल्ली वन विभाग आलापल्ली यांचे कार्यालयीन प्रांगणात उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारक जवळ वन वृत्तांतर्गत सिरोंचा, भामरागड, अल्लापल्ली, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प येथे 1987 ते 2021 पर्यंत10 वनहुतात्मे झालेल्या वीर शहिदांना राहुल सिंग टोलिया उपवनसंरक्षक आल्लापल्ली,
शैलेश मीना (भावसे) उपवन संरक्षक भामरागड वनविभाग प्रदीप बुधनवार उपविभागीय वन अधिकारी आल्लापल्ली, ठेंगरे परीक्षाविधीन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहीद परिवारातील सदस्य बबलू जनकलाल कुंजाम, शितल साईनाथ चिचघरे, संमक्का महेश मेकला, मदनंक्का मदनय्या गोरा, लक्ष्मीबाई अशोक अर्का, वैशाली गौतम दुर्गे, कुणाल दुर्गे,
आचल दुर्गे, वनश्री दुर्गे त्याचप्रमाणे कु आरती मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी, आल्लापल्ली, भावना सि अलोने वनपरिक्षेत्र अधिकारी पेड्डीगुडम, बी बी राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा, जेणेकर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली, क्षेत्र सहाय्यक सर्व,वनरक्षक सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत वन हुतात्म्यांना मान्यवरांच्या हस्ते व शहीद परिवारातील सदस्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून माल्यार्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
त्याचप्रमाणे शहीद परिवारातील सदस्यांना वनविभागातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रस्ताविक पुनम बुद्धावार अध्यक्ष वन शहीद स्मारक समिती यांनी केले तर मनोगत वर्सलखान, राजेश पिंपळकर,चांदेकर, ठेंगरे , बुधनवार , शैलेश मिना भावसे उपवनसंरक्षक भामरागड वन विभाग, राहुल सिंग टोलिया भावसे उपवनसंरक्षक आलापल्ली वन विभाग आल्लापल्ली, यांनी व्यक्त केले.
संचालन निलेश टेकाम वनरक्षक,तर आभार ईश्वर मांडवकर यांनी केले, वन हुतात्मा दिन साजरा यशस्वी करण्याकरिता, कुमारी आरती मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी, पुनम बुद्धावार अध्यक्ष वन शहीद स्मारक आलापल्ली, सुविनय सरकार वनपाल व त्यांची चमु परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले