Forbes Rich List 2024 : यावेळी फोर्ब्सच्या 2024 च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत 200 भारतीयांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी त्यात १६९ भारतीयांची नावे होती. या भारतीयांची एकूण संपत्ती ९५४ अब्ज डॉलर्स आहे, जी गेल्या वर्षीच्या ६७५ अब्ज डॉलरच्या तुलनेत ४१ टक्के अधिक आहे.
फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी हे अव्वल स्थानावर आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $83 अब्ज वरून $116 अब्ज झाली आहे, ज्यामुळे ते $100 बिलियन क्लबमध्ये प्रवेश करणारे पहिले आशियाई बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम ठेवले असून ते भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
America doubles its lead on China while India hits new high. These are the places the world's richest call home.
— Forbes (@Forbes) April 3, 2024
Read more: https://t.co/2KSDjUaV4V#ForbesBillionaires pic.twitter.com/h7Cl4fFxpp
या यादीनुसार गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती 36.8 अब्ज डॉलरने वाढली आहे. 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते यादीत 17 व्या क्रमांकावर आहेत. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. वर्षभरापूर्वी त्या सहाव्या क्रमांकावर होत्या. त्यांची एकूण संपत्ती $33.5 अब्ज आहे.
या यादीत 25 नवीन भारतीय अब्जाधीशांनी पदार्पण केले आहे. यामध्ये नरेश त्रेहान, रमेश कुन्हीकन्नन आणि रेणुका जगतियानी यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचवेळी बायजू रवींद्रन आणि रोहिका मिस्त्री यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
हे आहेत भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती
१. मुकेश अंबानी- 116 अब्ज डॉलर्स
२. गौतम अदानी- 84 अब्ज डॉलर्स
३. शिव नाडर- एकूण 36.9 अब्ज डॉलर्स
४. सावित्री जिंदाल- $33.5 बिलियन नेट वर्थ
५. दिलीप संघवी- 26.7 अब्ज डॉलर्स
६. सायरस पूनावाला – नेट वर्थ $21.3 अब्ज
७. कुशल पाल सिंग- 20.9 अब्ज डॉलर्स संपत्ती
८ .कुमारमंगलम बिर्ला – $19.7 अब्ज संपत्ती
९. राधाकिशन दमानी- 17.6 अब्ज डॉलर्स
१०. लक्ष्मी मित्तल- 16.4 अब्ज डॉलर्स
#ForbesBillionaires: There are some things that only money can buy, such as membership in the $100 Billion Club—the elite class of billionaires who have 12-figure fortunes. This year, a record 14 people worldwide qualify: https://t.co/rrOPWWzCQ7 pic.twitter.com/x2qUK96NAk
— Forbes (@Forbes) April 3, 2024