Monday, December 23, 2024
Homeशिक्षणसलग दुसऱ्या वर्षीसुद्धा सावित्रीबाई फुले विद्यालय, पातूर तालुक्यात प्रथम...

सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा सावित्रीबाई फुले विद्यालय, पातूर तालुक्यात प्रथम…

अनिकेत विठ्ठल घोरे ठरला 96.40% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा मानकरी

पातूर – निशांत गवई

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या इयत्ता दहावीचा निकाल 27मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये पातुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा 100 टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सावित्रीबाई फुले विद्यालयमधून एकूण 59 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.

आत्ताच व्हाट्सअप वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट, आपल्या परिसरातील घडामोडी व महत्त्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा. 

या मधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यामुळे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.सदर परीक्षेमध्ये विद्यालयातून 53 विद्यार्थी हे प्राविण्यश्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले तर 06 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यामधून अनिकेत विठ्ठल घोरे 96.40टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तर कु. खुशी प्रशांत भवाने 94.20 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु.साक्षी दीपक इंगळे 93.80 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून तृतीय क्रमांक मिळविला.

प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौ सपना म्हैसणे, संस्थेचे सचिव श्री सचिन ढोणे, विद्यालयाचे प्राचार्य जे. डी. कंकाळ इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व आपल्या आई-वडिलांना दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: