रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील १४ वर्षे वयोगटातील मुली च्या कबड्डी संघाने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा नागपूर जिल्ह्यचे नेतृत्व करण्याची संधी मिळवली आहे ,तालुका स्तरावर विजय प्राप्त करून…
रामटेक तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याऱ्या या संघाने भन्साळी बुनियादी विद्या मंदिर टाकळी सावनेर तालुका येथे नागपूर जिल्हा तिला 13 तालुके, सहभागी झाले होते..कबड्डी फायनल सामना हिंगना विरुद्ध झाला या अटीतटीच्या सामन्यात विजय प्राप्त करून नागपूर जिल्हाचे सतत पुन्हा दुसऱ्या वर्षी प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे…
सत्र २०२३-२४ मध्ये नागपूर जिल्हा कब्बड्डी सामने जिंकून विदर्भ स्तरावर वर नागपूर जिल्ह्यचे या संघाने नेतृत्व केले आहे …. या संपूर्ण विजयाचे श्रेय,अक्षरा कानतोडे,आचल कानतोडे , निधी मतारे, प्रगती सेलोकर,कांचन धुवाधप्पार, दृष्टी मालाकार, भुमेश्वरी यादवार, वैभवी पाटील, श्रृती ठाकरे, श्रद्धा पाटील, नंदिनी इंगळे, श्रुती भलावी,विध्यार्थी यांनी क्रीडा शिक्षक किसना पाटील सर,यांचे आभार मानले..
संयोजक केशव क्षिरसागर सर, शाळेचे मुख्याध्यापक रामरतन पुडके सर, सह क्रीडा संयोजक किशोर बिनझाडे सर, शिवशंकर जिझोते सर, दिनदयाल राहांगडाले सर, दिवाकर बंधाटे सर, हरिशजी हुड, राकेश ढोक, संजय सपाटे, कवडू ऊईके, जागेश्वर भिवगडे, अमोल वैद्य, अमृत बडवाईक,तसेच स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी चे संचालक तथा मा. सभापती नंदलालजी चौलिवार यांनी तसेच गावकऱ्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना गावाचे नाव लौकीक केल्याबद्दल अभिनंदन केले, संपूर्ण परिसरातुन मोठ्या संख्येने शुभेच्छांचा वर्षाव केला, गावातुन मिरवणूक काढून ढोल ताशा च्या गजरात फटाके व गुलालाची उधळण करित विजयी रॅली काढण्यात आली