Sunday, December 22, 2024
Homeराज्यमतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या महेश गणगणे यांनाच निवडून द्या - माजी...

मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या महेश गणगणे यांनाच निवडून द्या – माजी आमदार संजय गावंडे…

महाविकास आघाडीचे महेश गणगणे यांना मतदारांची पसंती…विजयाचा मार्ग सुकर...

अकोट – संजय आठवले

आकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. महेश गणगणे यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस श.प. आदींचे नेते कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत.

शिवसेना नेते संजय भाऊ गावंडे हे गावो गावी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. आणि मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या महेश गणगणे यांनाच निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.

महेश गणगणेसह सुरु असलेल्या त्यांच्या प्रचारयात्रेने तेल्हारा, दानापूर, माळेगाव, परिसरात रौंदळा, सांगलवाडी, कोठा, सायखेडा, माळेगाव बाजार, शेरी, बेलखेड, इत्यादी गावांना भेट देत मतदारांशी संवाद साधला. या प्रत्येक ठिकाणी त्यांचे मतदारांकडून स्वागत केले जात गेले.

ह्यावेळी मतदार आपल्या समस्यांचा पाढा महेश गणगणे यांच्यापुढे वाचत होते. शेतरस्ते, पाणी, वाढती बेरोजगारी यावर गेल्या काही वर्षांपासून जैसे थे स्थिती आहे. आता परिवर्तनाची गरज मतदारांना वाटत आहे. यास्थितीत पुढील आशेचा किरण म्हणून महेश गणगणे यांच्याकडे मतदार पाहत असून त्यांच्या विजयाचे चित्र मतदार संघात दिसत आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: