Friday, November 22, 2024
Homeराज्यमहाशिवरात्री यात्रेकरिता श्री. लक्षेश्वर नगरी लाखपुरी सज्ज…

महाशिवरात्री यात्रेकरिता श्री. लक्षेश्वर नगरी लाखपुरी सज्ज…

दर वर्षी जवळपास या ठिकाणी ५ ते ६ लाख भक्त दर्शनासाठी येतात….

कविवर्य़ उ.रा. गिरी यांचे गाव

वृत्तसेंवा – अतुल नवघरे

लाखपुरी – मुर्तिजापूर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे दर वर्षी महाशिवरात्री निमीत्य सकाळ पासुन भावीकांची अलोट गर्दी सुरु असते. लाखोंच्या संख्येने भावीक येथे दर्शनाल येतात. व अभिषेक सुध्दा येथे केल्या जाते.

मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे पुरातन कालीन तिर्थ क्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान लाखपुरी मंदीर असुन ते मंदीर रामायनकालीन असुन या गावाचे नाव आधी लक्ष्मणपुरी हे होते. येथे दर्शना करिता जन सागर उलटतो येथे दुर दुरुन भावी भक्त दर्शाना करिता येतात. तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथे श्रावण सोमवार, व महाशिवरात्री च्या पर्वावर विविध धार्मीक , सास्कृतीक शैक्षणीक कार्य़क्रमा सह क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. कालानंतराने लाखपुरी हे नाव झाले.

ऐतिहासीक दृष्ट्या लाखपुरी गावाचे विशेष महत्व आहे.लाखपुरी गावाचे पुर्वी लक्ष्मणपुरी असे नाव होते , मात्र राम –लक्ष्मण-सीता वनवासात असताना पुर्णा नंदीच्या काठावर लक्ष्मणाच्या हस्ते या मंदीराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते कारण या गावात राम-लक्ष्मण येवुन गेल्याची आख्यायिका आहे. लक्ष्मणाच्या पुजेच्या वेळी महादेवाच्या पिंढीचे अर्धे लिंग पुर्णा नंदीत पडले. त्यामुळे लाखपुरी हे गाव विकासापासुन कोसो दुर राहाले जर अर्धे लिंग पडले नसते तर आज शेगाव सारखा दर्जा या मंदीरा प्राप्त झाला असता व विकास पण झाला असता.

पुर्णा नंदी या गावतुन वाहते. हे मंदीर साडे अकरा ज्योती लिंग असलेले विदर्भातील एकमेंव मंदीर आहे. मंदीरात दगडात कोरलेली महादेवाची पिंड, शंकर मंदीर , विठ्ठल मंदीर , दत्तात्रेय मंदीर तसेच इतरही अनेक मुर्त्या व नंदीबैल भाविकांना आकर्षीत करतात. ब्रह्मा , विष्णू , महेश यांचे पुरातन मूर्ती असलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर लाखपुरी येथे आहे .श्रावण महिन्यातील सोमवारी पुर्णा नंदीतील जलाने शंकराला अभिषेक करण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे.

श्रावणात अखंड हरिनाम सप्ताह सुरु असतो .कावडधारी भक्तान साठी व महाशिवरात्री निमीत्य संस्थेतर्फे त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था केल्या जाते लाखो लोक उपस्थीत असतात. कविवर्य़ उ.रा गिरी सुध्दा लाखपुरी गावातील होते त्याचे अमरावती विद्यापीठाने बि. ए. भाग २ मध्ये त्याच्या (मार्गा वरुन माझ्या मि एकटा निघालो डोळ्यात चंद्र जखमी मी एकटा निघालो ) या कवितेचा समावेश आहे. त्यांचा उत्कृष्ट कवी म्हणुन अनेक सत्कार सुध्दा झाले आहे.

लाखपुरी हे तिर्थ क्षेत्र काशि म्हणून ओळख असणारे गाव आहे. महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी लक्षेश्वर संस्थान कडुन विविध उपाय योजना करण्यात आल्या यामध्ये श्री लक्षेक्ष्वर संस्थानने भविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी , वाहन तळ , तैराकी पथक ,आफत कालीन पथक , स्वागत कमान , येणाऱ्या भाविकांना ,स्वयंसेवाकांना व पोलिसांना फराळ, चाहाची व्यवस्था करण्यात येणार आहे . व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडुन चौक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे . महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लक्षेश्वर संस्थांन च्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: