Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यतिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीत गायरान जमिनीवर चारा लागवड...

तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीत गायरान जमिनीवर चारा लागवड…

शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अबलंब करावा- मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलांडे पाटील

अमरावती – दुर्वास रोकडे

नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होतो. हा आर्थिक ताण दुर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अवलंब करावा. यासाठी शासनाने गायरान किंवा वैयक्तीक जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चारा पिकांची लागवड करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीमध्ये गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलाँडे पाटील (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोर जावे लागतात. पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक नुकसान होऊन तो हतबल होतात. याचा परिणाम आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसून येतात. यासाठी शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे इतर माध्यम शोधणे आवश्यक आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी अंत्यत महत्वाचा पर्याय असून त्याच्याकडे उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोफत चारा उपलब्ध होईल. यामुळे जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होऊन पर्यायाने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही.

अमरावती जिल्ह्या 40 टक्के पशुसाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई आहे. चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान/वैयक्तीक जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चारा पिकांची लागवड करण्याबाबत शासन निर्णय नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांचा दि.7 जून 2024 रोजी निर्गमित केला आहे. या योजनेचा जिल्ह्यात प्रथमच तिवसा तालुक्यातील सार्सी ग्रामपंचायतीने गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. गावापासून एक किलोमिटर अंतरावर जंगलाच्या आतमध्ये असणाऱ्या ई-क्लास जमिनीवर घेण्यात आले.

या कार्यक्रमाला पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, उपजिल्हाधिकारी(रोहयो) ज्ञानेश्वर घ्यार, तिवसा गटविकास अधिकारी, अभिषेक कासोदे, जनसंपर्क अधिकारी(मिशन) महेन्द्र गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती वि‌द्यापीठचे अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच ग्रामपंचायत सार्सीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तहसिलदार, तलाठी व गावातील ग्रामस्थ या उ‌द्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: